Ad will apear here
Next
दहा सरकारी बँकांचे चार बँकांमध्ये विलिनीकरण होणार
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची घोषणा
निर्मला सीतारामननवी दिल्ली : देशातील दहा सरकारी बँकांचे चार बँकांमध्ये विलिनीकरण करण्याची घोषणा केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी शुक्रवारी (३० ऑगस्ट २०१९) नवी दिल्लीत केली. त्यामुळे सरकारी बँकांची संख्या २७वरून १२ होणार आहे. विलिनीकरणानंतर बँक कर्मचाऱ्यांची कोणतीही कपात केली जाणार नाही, असेही सीतारामन यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले. 

‘ओरिएन्टल बँक ऑफ कॉमर्स, युनायटेड बँक यांचे पंजाब नॅशनल बँकेमध्ये विलिनीकरण होणार आहे. कॅनरा, सिंडिकेट आणि आंध्र बँकेचे विलिनीकरण होऊन ती पाचवी मोठी सरकारी बँक असेल. इंडियन बँकेचे अलाहाबाद बँकेत विलिनीकरण होऊन सातवी मोठी बँक अस्तित्वात येईल. कॅनरा बँकेचे सिंडिकेट बँकेत विलिनीकरण होईल,’ असे सीतारामन यांनी सांगितले.   

‘सरकारी बँकांमध्ये मुख्य जोखीम अधिकारी’ नेमण्यात येईल,’ असेही त्यांनी सांगितले. नीरव मोदीने केलेल्या फसवणुकीसारख्या बँक घोटाळ्यांना पायबंद घालणे यामुळे शक्य होऊ शकणार आहे.

‘भारतीय अर्थव्यवस्थेला आलेली मरगळ दूर करण्यासाठी आणि अर्थव्यवस्था पाच ट्रिलियन डॉलर होण्याच्या दिशेने वाटचाल करण्यासाठी आम्ही आवश्यक ते सर्व प्रयत्न करत आहोत. बँकांच्या ‘एनपीए’ अर्थात थकित कर्जांचे प्रमाण घटले असून, ते ८.६५ लाख कोटींवरून ७.९० लाख कोटींवर आले आहे,’ असेही त्यांनी नमूद केले. 

(रिझर्व्ह बँकेच्या अतिरिक्त निधीतील एक लाख ७६ हजार कोटी रुपये केंद्र सरकारला देण्याचा निर्णय नुकताच घेण्यात आला. त्यावर विरोधी पक्षांनी टीका केली असली, तरी तो निर्णय योग्य असल्याचे अर्थतज्ज्ञांचे मत आहे. या निर्णयाच्या दोन्ही बाजूंचे विश्लेषण वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/YZOWCD
Similar Posts
‘नवभारत निर्मितीच्या मार्गावर जाणारा अर्थसंकल्प’ नवी दिल्ली : देशाच्या पहिल्या पूर्णवेळ महिला अर्थमंत्री असलेल्या निर्मला सीतारामन यांनी शुक्रवारी, पाच जुलै रोजी त्यांचा पहिला अर्थसंकल्प लोकसभेत सादर केला. या अर्थसंकल्पात शेती, ग्रामीण विकास, कौशल्य विकास, गरिबांना सोयी-सुविधा, संशोधन, डिजिटल अर्थव्यवस्था, महिला सक्षमीकरण यावर भर देण्यात आला आहे. ‘हा
बँकांच्या शेअर्समध्ये उलाढाल वाढण्याची शक्यता गेल्या आठवड्यात केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सहा राष्ट्रीय बँकांच्या विलिनीकरणाची घोषणा केली. त्यामुळे बँकांच्या शेअर्समध्ये थोडीशी उलाढाल वाढली असून, ज्या बँकांचे अस्तित्व कायम रहाणार आहे, त्यांच्या शेअर्सचे भाव हळूहळू वाढत जातील. त्यामुळे अशा बँकांच्या शेअर्समधील गुंतवणूक लाभदायी ठरावी
देशाची अर्थव्यवस्था २०२५ पर्यंत पाच लाख कोटी डॉलर्सवर नेण्याचे लक्ष्य नवी दिल्ली : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी शुक्रवारी,सकाळी अकरा वाजता लोकसभेत आर्थिक वर्ष २०१९-२० साठीचा देशाचा अर्थसंकल्प सादर करण्यास सुरुवात केली.
देशातील पहिली एअरट्रेन नवी दिल्लीच्या इंदिरा गांधी विमानतळावर होणार नवी दिल्ली : नवी दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर अंतर्गत प्रवासासाठी लवकरच ‘एअरट्रेन’ सुरू केली जाणार आहे. एअरट्रेन म्हणजे खास विमानतळासाठी असलेली मेट्रो रेल्वेची सुविधा. अशी सुविधा असणारा हा देशातील पहिला विमानतळ ठरणार आहे.

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language